सिल्लोड, (प्रतिनिधी) ; लिहाखेडी (ता. सिल्लोड) वाचन संस्कृतीला चालना मिळावी, आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची प्रेरणा वाढावी, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त कै. कडुबा पा. साखळे ग्रंथालय आणि छत्रपती बिगरशेती सहकारी पतसंस्था, लिहाखेडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धे चे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा दि. १२ ऑक्टोबर रोजी (रविवार) मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये सिल्लोड, कन्नड तसेच भोकरदन तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे स्पर्धा केंद्रावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी अनुशासन आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले.
उद्घाटन प्रा. शिवराम साखळे चेअरमन, अशोक साखळे सरपंच पती, नामदेव साखळे मुख्याध्यापक, दिलीपराव साखळे, देवाजी गव्हाणे, अंबादास सपकाळ, बाळाराम पा. साखळे, विनोद चव्हाण, हरिदास साखळे, कृष्णा साखळे, विष्णू फरकाडे, राजू साखळे, बाळा बावस्कर, सयाजी गोरे, गणेश बावस्कर, अभिजीत साखळे, गणेश धनवाई, राजेश दौड, भुतेकर भाले, समाधान भाले, ललिता साखळे, चंद्रभान साखळे, विशाल साखळे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, पुस्तक हे माणसाचे
खरे मित्र असतात. नियमित वाचनामुळे विचारसंपन्नता आणि निर्णयक्षमता वाढते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची आवड निर्माण झाली आहे.
पालक, शिक्षकांनीही आयोजकांचे कौतुक केले. परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
ग्रंथालय समितीचे कार्यवाह म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग प्रेरणादायी होता. पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणावर घेण्याचा आमचा मानस आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढीस लागली असून, लिहाखेडी गाव शिक्षण आणि ज्ञानप्रेरणेचे केंद्र बनत असल्याचे चित्र दिसत आहे.